Friday, October 31, 2025

शिर्डी साईबाबा संस्थान देशी गाईंची गोशाळा सुरु करणार,साई मंदिरात दैनंदिन पूजाअर्चासाठी गावरान गाईचे शुद्ध तूप उपलब्ध होणार

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या बैठकीत देशी गाईंची गोशाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात भारतीय वंशाच्या १०० देशी (गावरान) गाई गोशाळेत दाखल होणार आहेत. गोशाळेमुळे साई मंदिरात दैनंदिन पूजाअर्चासाठी गावरान गाईचे शुद्ध दूध व तूप तसेच द्वारकामाईतील पेटत्या धुनीसाठी शेणाच्या गोवऱ्या उपलब्ध होणार आहेत. गोमाता रक्षणाचा संदेशही साईभक्तांमध्ये यानिमित्ताने जाणार आहे.

साईबाबा संस्थानकडे ३०० एकर जागा उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून विचाराधीन गोशाळा प्रकल्पाला साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजु शेंडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. गावरान गाईंची गोशाळा सुरु करण्याचा तदर्थ समितीचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यातून गोरक्षणाचे महत्व, संस्कृतीत अध्यात्मिकदृष्ट्या गायींना असणारे महत्त्वपूर्ण स्थान याबाबत अधिक जनजागृती होण्यास अधिक मदत होईल. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भारतीय वंशांच्या गायीचे संवर्धन होणार आहे.

द्वारकामाई धुनीत टाकण्यासाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा खर्च मोठा असतो या खर्चात बचत होणार आहे. उच्च न्यायालयाची परवानगी प्राप्त होताच श्री साईबाबांची गोशाळा सुरु होईल. टप्प्याटप्प्याने साईबाबा संस्थानच्या लाडूप्रसादासाठी लागणारे गावरान गाईचे शुद्ध तूप उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे प्रसादाचा दर्जा व गुणवत्ता अधिक वाढेल तसेच इतर दुग्धजन्य पदार्थही अधिक शुद्ध व भेसळ विरहित प्राप्त होतील. साईबाबा गोशाळेस साईभक्तांकडूनही मोठी मदत होईल, अशी भावना साईभक्तांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

श्री साईबाबा संस्थानने गोशाळा चालवावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी केली होती त्यावर पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवले होते. मुख्यमंत्री सचिवालयाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करून गोशाळा प्रकल्पास मंजुरी मिळवली. त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या तदर्थ समिती बैठकीत देशी गाईची गोशाळा सुरू करण्याचे निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. आपल्या मागणीस मोठे यश मिळाले. – ॲड. विक्रांत वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles