Tuesday, October 28, 2025

नगर शहरात शिवसेना व रिपब्लिकन सेनेचे युतीपर्व , ही युती विजयाची नांदी ठरणार

शहरात शिवसेना व रिपब्लिकन सेनेचे युतीपर्व
संवाद मेळाव्यात एकवटले पदाधिकारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार
शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या युतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह -सचिन जाधव
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात युती झालेल्या शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा शहरात पार पडला. या मेळाव्यात दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी युतीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा व सर्व उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या मेळाव्याप्रसंगी संभाजीराजे कदम, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे, दत्तात्रय कावरे, आप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, महेश लोंढे, दामोदर भालसिंग, शहराध्यक्षा सुनिता शिंदे, उपाध्यक्ष नेहा जावळे, महेश भोसले, संघटक बेबीताई टकले, बाळासाहेब कसबे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, सविता कवडे, संजय ताकवले, सत्यवान नवगिरे, गणेश परहार, रवींद्र उरणकर, गणेश कोकडे, सनी कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये वेगळा आनंद निर्माण झाला आहे. एकजुटीने महापालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल शिंदे म्हणाले की, या युतीच्या माध्यमातून बहुजन समाज एकवटला जाणार आहे. या युतीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे. तळागाळापर्यंत सर्व कार्यकर्ते एकमेकांशी जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी कदम यांनी ही युती विजयाची नांदी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles