Tuesday, October 28, 2025

नगर शहरात आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होणार ; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिवसेनेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शहरात स्वागत
निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीचा भुसे यांनी दिला कानमंत्र
महापालिकेवर भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा निर्धार -अनिल शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसे यांनी पदाधिकारी व माजी नगरसेवकांसोबत चर्चा करुन निवडणुकीतील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, संभाजी कदम, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, संग्राम कोतकर, विजुभाऊ पाठारे, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, पारुनाथ ढोकळे, आशिष शिंदे, सचिन लोखंडे, ओंकार शिंदे, शुभम कावळे, अक्षय कोंडवार, प्रथमेश भापकर, शुभम चिपाडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिवसेना ही केवळ पक्ष नाही तर जनतेचा विश्‍वास आहे. नगरकरांनी शिवसेनेवर जो विश्‍वास दाखवला आहे, त्याचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर नगरकरांच्या आशीर्वादाने विराजमान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शिवसैनिक सध्या घराघरांत जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसणार आहे. शिवसेनेचा भगवा लवकरच महापालिकेवर फडकणार आहे. जनसेवाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य शिवसेनेचे राहिले असून, महापालिका निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles