Friday, February 20, 2026

भाजपचा पुन्हा शिंदेंना धक्का, नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला, जय महाराष्ट्र करत घेतलं कमळ हातात

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोकेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर काही तासातच त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि प्रभाग दोनच्या उमेदवार पूजा ढोके यांनीही अर्ज मागे घेतला. फुलंब्रीत 9 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिंदेसेनेचे केवळ चार उमेदवार शर्यतीत राहिलेत आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचाच उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या आनंदा ढोके यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे.

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदर राज्यात युतीमध्ये सोबत असलेल्या शिवसेना-भाजप मधीलच शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके हे भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे फुलंब्रीत भाजपची ताकद वाढली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आनंदा किसन ढोके यांनी आपली उमेदवारी मागे घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

या सोबतच प्रभाग दोनमधून उमेदवारी दाखल केलेल्या त्यांच्या कन्या पूजा आनंदा ढोके यांनीदेखील आपला अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाने ०९ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत सहा उमेदवारांनी माघार घेतली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील बाहेर पडल्यानंतर आता फक्त चार जागांवरच शिंदे गट शर्यतीत राहिला आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत सध्या भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. शिवसेना स्वतंत्र लढवत आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहेत. २ तारखेला मतदान होणार आहे, तर ३ तारखेला निकाल लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles