नगर तालुक्यातील डोंगरगण येथील सरपंचासह तनपुरे गटाचे कार्यकर्ते आ. शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच तनपुरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जेऊर गटात कर्डिले गटाची ताकद वाढली असून, तनपुरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी डोंगरगण येथील उपसरपंच संतोष पटारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच तनपुरे गटाची साथ सोडत कर्डिले गटात प्रवेश केला होता. सरपंच वैशाली मते यांनीही कर्डिले गटात प्रवेश केल्याने जेऊर जिल्हा परिषद गट व गणात कर्डिले गटाची ताकद वाढली आहे. मते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आशाबाई कदम, भीमाबाई कोकाटे, अशोक चांदणे, सर्जेराव मते व पद्माताई काळे, सर्जेराव मते आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.दोन महिन्यांपूर्वी तनपुरे गटाचे प्राबल्य असलेल्या इमामपूर ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य आ. कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आ. कर्डिले यांनी तेथील विकासाचा अनुशेष भरून काढत अवघ्या सहा महिन्यांत अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे शेजारच्या डोंगरगण गावातही मते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी, तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आ. कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी बबनराव पठारे, डॅनियल शिरसाट, अशोक घोरपडे, जालिंदर आढाव, संजय आढाव, अशोक मते, संतोष खेत्री, रामदास भुतकर, राजेंद्र भुतकर, जगन्नाथ खेत्री, दत्तात्रय काळे, यशवंत चांदणे, सचिन कदम, भास्कर मते, कुंडलिक भुतकर, पोपट गायकवाड, भरत खेत्री, अक्षय मते, विशाल भुतकर, कोंडीराम झरेकर, गमाजी मते, बाबासाहेब मते, दिलीप कदम, कैलास मते, प्रदीप पाटोळे, रामदास मते आदी उपस्थित होते.


