Saturday, February 21, 2026

नगर शहरातील उपनगरात गोळीबार प्रकरण,सांगळे, आव्हाडला दोन दिवस पोलीस कोठडी

अहिल्यानगर -तपोवन रोड येथील गोळीबाराच्या घटनेमधील दोन मुख्य संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवस (दि. 18) पोलीस कोठडी सुनावली आहे. भिमराज आव्हाड (वय 58, रा. नित्यसेवा, पाईपलाईन रोड), राहुल विजय सांगळे (वय 33, रा. शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत.संशयित आरोपींनी प्रमोद घोडके (रा. दत्तमंदीर शेजारी, ढवणवस्ती, तपोवन रोड) यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.आव्हाड याने दोन राऊंड फायर केले होते. या गुन्ह्यातील चार संशयितांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. रविवारी अटक केलेल्या आव्हाड व सांगळे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित आरोपींच्यावतीने महेश तवले व संजय दूशिंग यांनी बाजू मांडली. तर तपासी अधिकार्‍यांनी पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांनी घटनास्थळी येताना व जाताना वापरलेले वाहन जप्त करायचे आहे.

संशयित आरोपी आव्हाड यानेच फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरींग केल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सांगत असल्याने त्याचा तपास करायचा आहे. खून करण्याचा प्रयत्न करण्याचे कारण काय, याबाबत तपास करायचा आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये अकिब शेख याच्या हातातून संशयित आरोपी आव्हाड याने पिस्टल घेतल्याचे दिसत आहे, याबाबत चौकशी करायची आहे. यात आणखी संशयित आरोपी आहेत का, याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles