Friday, February 20, 2026

नगर तालुक्यातील श्री चांगदेव विद्यालय नारायणडोहोचा ९१. ४८ टक्के निकाल

श्री चांगदेव विद्यालय नारायणडोहोचा ९१. ४८ टक्के निकाल.

श्री चांगदेव विद्यालय चा निकाल ९१.४८ टक्के समृद्धी नवनाथ साठे ९५.८० टक्के गुण मिळवून मुलीमध्ये टाकळी काझी केंद्रात प्रथम

नारायणडोहो । प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नारायणडोहो येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री चांगदेव माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल ९१.४८ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातून ४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यावर्षी देखील उज्वल यशाची

परंपरा कायम राखली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त मिळवले आहेत. १९ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये, ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये तर ५ विद्यार्थी श्रेणीत मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयात गुणांनुक्रमे प्रथम आलेले एक विद्यार्थीनी

पुढीलप्रमाणे कु. समृद्धी नवनाथ साठे (९५.८० टक्के) विद्यालयात प्रथम आली तर कु. श्रद्धा विशाल साठे (९४.८० टक्के द्वितीय आली. कु. समृद्धी दिलीप गायकवाड (९२. ८० टक्के) तृतीय, कु. अमृता जितेंद्र शिंदे (९१.०० टक्के) चतुर्थ तर कु दीप्ती विजय साळवे (८८. २० टक्के) पाचवी आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. सोनवणे एस. जी. शिक्षक सत्रे एम. एस. , श्रीमती थोरवे एस. आर. श्रीमती कार्ले एस. एम. व सुनिल म्हस्के सर
व विद्यालयातील इतर सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त व शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री मुकेशदादा मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पालक नवनाथ साठे, दिलीप गायकवाड, जितेंद्र शिंदे,विशाल साठे, विजय साळवे सर्व यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील इयत्ता १० वी च्या या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना

मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व प्रशासनाचे संस्थेचे अध्यक्ष मा.रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर साहेब, सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम , श्री चांगदेव वसतिगृहाचे अधीक्षक धोंडे सर, महेश म्हस्के सर, घुंगार्डे सर, अकोलकर मॅडम, मतकर मॅडम,कदम भाऊसाहेब,भरत साठे, बाळासाहेब साठे, जाधव मामा शाळा समितीचे सदस्य , नारायणडोहो परिसरातील शिक्षण प्रेमी पालक, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles