पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. राज्यातील एका बड्या नेत्याने तर दोन्ही पवार एकत्रच असून ते फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथील जाहीर सभेतून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही पवार एकच आहेत. मात्र त्यांनी भाजपला उल्लू बनवलं आहे. मी मागच्यावेळीही म्हटलं होतं की अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. सत्तेसाठी भाजपनं तत्त्व सोडलं आहे. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचीही अंबनरनाथमध्ये भाजपसोबत युती झाली आहे. पक्ष, विचर आता महत्वाचा नाही. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतंय, असा हल्ला प्रकाश आंबेडकर यांनी चढवला.
मी आधीच म्हटलं होत की हे दोघे वेगळे नाहीतच, फक्त त्यांनी भाजपला उल्लू बनवलं. चौकशी लागली होती म्हणून एक जण भाजपसोबत गेला. स्वतःवरची चौकशी थांबवली. एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यावर आठवण करून देतायत की 70 हजार कोटीची फाईल पेंडिंग आहे. आम्ही उलट भाजपला विचारतोय तुम्ही एवढे दिवस फाईल दाबली का? यांचा खुलासा करा. जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे, पण पुण्यात, ठाण्यात युती नाही. यांचा राजकीय अर्थ असं काढतोय की भाजपला दोघांना (सेना-राष्ट्रवादी) संपवायचं आहे. म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे.


