दंतरोग व मौखिक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्या नगर –
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, इंडियन डेंटल असोसिएशन तसेच डॉ. दिलीप पवार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चास प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १ एप्रिल रोजी दंतरोग व मौखिक आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये चास प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील नागरिकांना अनुभवी दंततज्ज्ञांकडून मोफत दंततपासणी व आवश्यक सल्ला देण्यात आला. दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने दात घासणे, तोंडाची स्वच्छता राखणे, तसेच दात मजबूत व निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात दंतरोगांवर मोफत उपचार करण्यात आले असून, नागरिकांमध्ये HPV लसीकरणाबाबत जागृतीही करण्यात आली. या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जनजागृतीला चालना मिळाली.
या शिबिरात इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ओंकार भालसिंग, सचिव डॉ. शिल्पा इनमुलवार, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद निक्रड, ग्रामीण दंत आरोग्य व जनजागृती प्रतिनिधी डॉ. निकिता विधाते, तंबाखू नियंत्रण प्रतिनिधी डॉ. विजय सिंह तनपुरे, डॉ. मृदुला मुळे (ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी व IDA जर्नल संपादक) तसेच डॉ. सचिन साळे (क्रीडा प्रभारी) यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर चास ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मा. सरपंच पोपटराव घुंगार्डे यांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच मा. सभापती रामदास भोर, उद्योजक राधाकृष्ण वाळुंज, मा. सरपंच राजेंद्र गावखरे, अंकुश आतकर, पोलीस पाटील रमेश रासकर, उद्योजक सुनिल गोंडाळ, मारुती देवकर, संदीप वाळुंज, दत्ता भोर, रोहन भोर, अनिल देवकर यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दंतरोग व मौखिक आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळून आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली.
नगर तालुक्यात दंतरोग व मौखिक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
- Advertisement -


