एसटीच्या नव्या बसचे नाव आता होणार ‘राजमाता जिजाऊ’

एसटीच्या राज्यभरातील गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ताफ्यात ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत या बसला ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे.

गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ताफ्यात ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या असणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles