Friday, February 20, 2026

स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीबाबत मोठा निर्णय , बँकेच्या ग्राहकांना झटका !

स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. एफडीवरील व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. एफडीवरील व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहे. ही कपात ३ कोटींपेक्षा जास्त असलेल्या एफडीवर करण्यात आली आहे

स्टेट बँकेचे एफडीवरील व्याजदर हे १६ मेपासून लागू होणार आहे. स्टेट बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर आता अनेक बँका एफडीवरील व्याजदर कमी करत आहे. दरम्यान, आता स्टेट बँकेने एफडीवरील व्याजदर कमी केले आहे.

स्टेट बँकेचे एफडी रेट्स (SBI FD Rates)

स्टेट बँक ऑफ इंडिया ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडी ऑफर करते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्याजदर दिले जाते. या एफडीवरील व्याजदर ७.३० टक्के आहे.

स्टेट बँकेच्या एफडीचे नवे व्याजदर (SBI FDNew Interest Rate)

७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.५० टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के व्याजदर

४६ दिवस ते १७९ दिवसांसाठीच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ६ टक्के व्याज दिले जाते.

१८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ६.०५ टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ६.५५ टक्के व्याज मिळते.

२११ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.३० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के व्याज मिळते.

१ ते २ वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ७ टक्के व्याज

२ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना ६.७० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याज मिळते.

३ ते ५ वर्षांच्या एफडीवर ६.५५ टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के व्याज मिळते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles