Thursday, February 19, 2026

Ahilyanagar…. अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची. मोठी कारवाई…१.८२ कोटींंचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक, मुंबई यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अहिल्या नगर जिल्ह्यात मोठी कारवाई करत परराज्यातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणले जाणारे विदेशी मद्य पकडले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु टोल नाका येथे लेन क्र. ७ वर पाळत ठेवून कठ-४७-ऋ-३४९० क्रमांकाचा अशोक लेलैंड कंपनीचा सहा चाकी कंटेनर ट्रक अडवण्यात आला. तपासात ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे तब्बल १५०० बॉस आढळून आले. एकूण एक कोटी ८५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाहन चालक प्रेमकुमार जनकधारी सिंग याला महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय, मुंबई यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रविंद्र उगले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रियाज खान व विजयकुमार थोरात यांच्या नेतृत्वात पथकाने सापळा रचला. गुन्हयात दुय्यम निरीक्षक नवनाथ घोडके, जवान सर्वश्री राजाराम सोनवणे, दिलीप नागरे, विकास गायकवाड, बाबु देवकर, ओंकार हराळे यांनी भाग घेतला.

कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोणे, यांच्या आदेशान्वये निरीक्षक बी. एस. घुगे सहाय्यक दुय्यम निरीक्षक पारधे व जवान अविनाश कांबळे यांनी मदत केली.फिर्याद विजय रघुनाथ ढवळे यांनी दिली असून तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles