रिपब्लिकन सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन.
विध्यार्थ्याच्या खून प्रकरणी हिंद सेवा मंडळ संचलित सीताराम सारडा विद्यालयातील मुख्याध्यापकांना निलंबित करून शिक्षक, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- शालेय विध्यार्थ्याच्या खून प्रकरणी हिंद सेवा मंडळ संचलित सीताराम सारडा विद्यालयातील मुख्याध्यापकांना निलंबित करून या विद्यालयातील शिक्षक, व इतर कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास रणदिवे, संजय ताकवाले, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, १८ जून रोजी शाळेच्या वेळेत दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सर्जेपुरा भागातील दोन विध्यार्थ्यांमध्ये पूर्वीच्या किरकोळ वादातून भांडण झाले, त्या वादाचे पुनवर्सन म्हणजे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावी च्या वर्गात शिकणाऱ्या विदयार्थ्याच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून खून केला. ही बाब निश्चितच हदरवून सोडणारी आहे. शाळेच्या आवारात अशी घटना घडली कशी? तसेच विदयार्थ्याकडे चाकू आला कसा? शाळेत सुरक्षा रक्षक आहेत की नाहीत? शिक्षकांचा विदयार्थ्यांवर अंकुश आहे की नाही? शाळेच्या आवारात खून होत असून या घटनेची जबाबदारी संस्था व शालेय व्यव स्थापनाची नाही का? असे प्रश्न निवेदनातून उपस्थित केले आहेत.
सीताराम सारडा विद्यालयात लालटाकी, सिद्धार्थ नगर, निलक्रांती चौक, कोठला, मंगलगेट, सर्जेपुरा, आदी भागातील बहुजन समाजातील गोरगरीब विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची पट संख्या टिकून आहे. मग फक्त पट संख्या टिकवून ठेवण्या इतपतच शाळेची जबाबदारी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या खून प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाचे त्वरित निलंबन करून सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा लवकरात लवकर कारवाई न झाल्यास माध्यमिक शिक्षण विभागच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
विध्यार्थ्याच्या खून प्रकरणी… हिंद सेवा मंडळच्या विद्यालयातील मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी
- Advertisement -


