मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी सुभाष लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी दिपाली बारस्कर तर उपसभापतीपदासाठी वर्षा सानप मैदानात
महापौर ज्योतीताई गाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर
अहिल्यानगर महापालिका स्थायी समितीच्या सभापती सुभाष लोंढे तर महिला बालकल्याण सभापती दिपाली बारस्कर यांचे अर्ज दाखल अधिकृत निवडीची घोषणा उद्या दहा मार्चला होणार उपसभापती वर्षा सानप
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका येथील स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव मेहर लहरे यांच्याकडे दाखल केला. या अर्जाला सुचक म्हणून नगरसेवक मनोज कोतकर तर अनुमोदक म्हणून निखिल वारे यांनी सह्या केल्या.
तसेच मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सुचक म्हणून सुनिता भिंगारदिवे तर अनुमोदक म्हणून अनिता शेटीया यांनी सह्या केल्या.
दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सुचक म्हणून वंदना ताठे तर अनुमोदक म्हणून रोशनी त्रिंबके यांनी सह्या केल्या.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक विकी जगताप, भाजपच्या गटनेत्या शारदाताई ढवण तसेच नगरसेविका संध्या पवार, शीतल ढोणे, नगरसेवक ऋग्वेद गंधे, अजिंक्य बोरकर, विजय गव्हाळे, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार, महेश तवले, महेश लोंढे, विजय पठारे, सतीश शिंदे, अनिल ढवण, सुनील त्रिंबके, अजय ढोणे, किसन भिंगारदिवे, जितू गंभीर आदी उपस्थित होते.


