Wednesday, October 29, 2025

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, आजचं पहिलं प्रमाणपत्र वितरीत; 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण

हिंगोली : कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता. मुंबईच्या आझाद मैदानातील उपोषणाच्या 5 थ्या दिवशी सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिरच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्यास मान्यता दिली. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला होता. आता, त्याच जीआरच्या आधारे मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र जारी केले जात आहे. मराठावाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्याहस्ते मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी 50 कुणबी जातीचे प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना वितरित केले जाणार आहेत.

मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले होते, मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटिरचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार, हैदराबाद गॅझेटियर लागू करत नोंदी सापडलेल्या, पुरावे असलेल्या कुणीबी मराठांना कुणीबी जातीचा ओबीसी दाखला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने मराठा समाज बांधवांना आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केला जाणार आहे.

हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याहस्ते हिंगोली जिल्ह्यातील 50 मराठा समाजातील लाभार्थ्यांना उद्याच हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मराठा समाजाला मिळणारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला सर्वात अगोदर एबीपी माझावर पाहायला मिळणार आहे. एकंदरीत याची पद्धत काय आहे कशा पद्धतीने हे जातीचे प्रमाणपत्र विक्री केले जाणार आहे या संदर्भात हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार त्रिसदस्यी ग्रामस्तरीय समितीच्या पडताळणीनंतर नियमानुसार हे जात प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ज्या अर्जदाराकडे 1967 च्या अगोदरचा पुरावा, किंवा ज्याकडे पुरावा नसेल त्यांनी तो संबंधित गावात राहात होता, तिथे शेती होती हे सिद्ध केल्यास त्या अनुंषगाने नागरिकांचे जबाब घेऊन, चौकशी करून हे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. त्यामध्ये, रक्तासंबंधातील नातेवाईकांना यापूर्वी कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, याची खात्री करुन हे कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles