सुजित,कार्यतत्पर युवक शिवसेनेची ताकद वाढवतील – एकनाथ शिंदे ; सुजित झावरे यांचा शिवसेनेत प्रवेश
टाकळी ढोकेश्वर सुजित झावरे हे उमदे आणि जनतेशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते आहेत.योग्य वेळेत,योग्य घरात ते आले आहेत.माजी आमदार वसंतराव झावरेंची पुण्याई तुमच्या पाठीमागे आहे.आता विकासकामांची
काळजी करु मी तुमच्या पाठीशी आहे. सुजित,कार्यतत्पर युवक शिवसेनेची ताकद वाढवतील आसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार अमोल खताळ,आमदार विठ्ठल लंगे,आमदार शरद सोनवणे,माजी खासदार सदाशिव लोखंडे,माजी आमदार भानुदास मुरकुटे,रेश्मा जगताप,संदेश कार्ले,संभाजी कदम,आनंद शेळके,रामदास भोर,विद्या गायकवाड,बाबु टायरवाले,मिरा शिंदे,प्रताप कुलट, जिल्ह्यातील व तालुक्यातील शिवसेना
पदधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,शिवसेनेत सर्व कार्यकर्ते आहेत जो काम करेल तो पुढे जाईल.
सुजित यांच्या कामांची मी माहीती घेतली अनेक पदावर त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे आता तालुक्यापासुन राज्यापर्यंत सर्व ताकद तुम्हाला देऊ येथुन मागे जो विश्वासघात तुमचा झाला आहे तो येथे होणार नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मोठ्या ताकदीने आपल्यालाला लढायच्या आहेत.मी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाभिमुख राजकारणाचा मार्ग स्वीकारला. ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली, पण विरोधकांनी ती थांबवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. सीएम म्हणजे कॉमन मॅन — सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री. जनतेचा विश्वास हा माझा सर्वात मोठा आधार आहे.तालुक्यापासून राज्यापर्यंत शिवसेना मजबूत करायची आहे. जनादेश आमच्याकडे आहे.शिवसैनिक लढणारे असतात, रडणारे नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित आहे.यावेळी तालुक्यातील २६
गावांच्या विद्यामान सरपंचांनी झावरे यांच्यासमवेत शिवसेनेत प्रवेश केला.
पारनेरचा विकास आरखडा,
पाणीयोजना यांच्या मंजुरीबाबत व सुपे एमआयडीसी मध्ये कचरा निर्मुलन प्रकल्प साठी निधी,रोजगार हमी योजनेंतर्गत स्थगित केलेले कामे सुरु करण्यासाठी कान्हूर पठार व पारनेर मंडलातील नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी सुजित झावरे यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत हे सर्व मंजुर करणार आसे आश्वासन दिले.
“१४ वर्षांनंतर संपला माझा वनवास” — सुजित झावरे
“माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळापासून आमच्या कुटुंबाला जनतेने साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेवेळी वडिलांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण नंतर त्यांची उमेदवारी कापली गेली. २०१९ मध्ये शिवसेनेतून आयात उमेदवार आणून मला डावलण्यात आले, तरीही आम्ही विकासाच्या बळावर हा संच टिकवला,” असे सुजित झावरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, “शिवसेनेला आता वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवणार आहे. पारनेरचा भौगोलिक विस्तार मोठा असला तरी जनतेचा विश्वास हा माझा बळ आहे; आणि तुमच्यासारखा निधी देणारा नेता कोणीच नाही.”
बिबट्यांच्या हल्ल्यांवर पूर्ण नियंत्रण आणण्यासाठी शासन पातळीवर योजना तयार केली जात आहे.वाढत्या बिबट्यांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


