Monday, February 23, 2026

राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली ;सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिकामे झाले आहे. त्यामुळे आता हे पद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनवले जाते अशी मागणी होत आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘दादांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलं नाही. दादा आमच्यातच आहे असं वाटतं. या शोकमग्न अवस्थेत आम्ही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणं माझ्यासाठी क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयात पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याच्या भावनेतून मी इथे आलो होतो.’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना सनील तटकरे म्हणाले की, ‘आज मुख्यमंत्र्यांशी भेट जरूर झाली. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीत आहे. त्यानंतर आम्ही कुटुंबाशी संपर्क करू. जनतेच्या मनातील मत, आमदारांच्या मनातील मत या सर्वांवर बोलू. सुनेत्रा वहिनींशी बोलणंही महत्त्वाचं आहे. दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला. त्यांच्या दुखद निधनाने राज्य शोकमग्न आहे. त्याच शोकाकूल वातावरणात आम्ही आहोत. बाकीच्या विषयावर चर्चा नाही.’ दरम्यान, या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश होता. त्यांनी सीएम फडणवीस यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची सुमारे सव्वातास बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील घडामोडीना वेग आला आहे.

अजितदादा यांच्या निधनाने रिक्त असलेल्या जागेचा निर्णय लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विधिमंडळ पक्षनेता ठरविण्याबाबत शनिवारी बैठक होणार आहे. त्या बैठकीत निवड केली जाणार आहे. त्याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय झाल्यास शनिवारी नव्या उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना सनील तटकरे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट जरूर झाली. सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे कुटुंब धार्मिक विधीत आहे. त्यानंतर आम्ही कुटुंबाशी संपर्क करू. जनतेच्या मनातील मत, आमदारांच्या मनातील मत या सर्वांवर बोलू. सुनेत्रा वहिनींशी बोलणंही महत्त्वाचं आहे. दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला. त्यांच्या निधनाने राज्य शोकमग्न आहे. त्याच शोकाकूल वातावरणात आम्ही आहोत. बाकीच्या विषयावर चर्चा झाली नाही.’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles