रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी सुनील शिंदे यांची निवड.
नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर पूर्व, मुंबई येथे रिपब्लिकन सेनेची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेश व उत्तर महाराष्ट्र या विभागातून २९ जिल्हाअध्यक्ष यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे या आढावा बैठकीत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सर्वांशी व्यक्तिगत चर्चा करून प्रत्येक जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेतला व क्रियाशील कार्यकर्ता नोंदणीची माहिती घेउन पक्ष प्रवेश कार्यक्रम आदी उपक्रमाची माहिती घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ शिंदे यांची या बैठकीत दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करुन नियुक्तीपत्र रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते देन्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद काळे, विकास रणदिवे आदीसह सर्व महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
नूतन दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी गेल्या २० वर्षापासून सामाजिक चळवळीत योगदान दिले व आंबेडकर यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहून आपले सामाजिक कार्य करत असल्याने या सामाजिक कार्याची दखल घेत निवड करण्यात आली व शिंदे म्हणाले की, रिपब्लिकन सेनेचे कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार असून रिपब्लिकन सेना ही अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी गाव तेथे शाखा उपक्रम राबवून संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले व लवकरच अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याची घोषणा देखील कऱण्यात आली व या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रिपब्लिकन सेनेचे नगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी सुनील शिंदे यांची निवड
- Advertisement -


