Thursday, February 19, 2026

सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं; फडणवीस-गडकरींची मध्यस्थी ?

ष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालं आहे. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे.

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles