Thursday, February 19, 2026

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी म्हणत जोडले हात? सुप्रिया सुळे म्हणाल्या….

शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयावर मत मांडलं. त्यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करत वक्तव्य केले. त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविषयी चौकशीची मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले. यावेळी पत्रकारांनी विलिनीकरणात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आडकाठी आणत आहेत का, असा सवाल केला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी हात जोडत रामकृष्ण हरी असं म्हटलं. त्यांनी जे अचूक टायमिंग साधलं, त्याची एकच चर्चा सुरू आहे.रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. अशी मोठी घटना घडते तेव्हा अस्वस्थ वाटणे हे सहाजिक आहे. रोहित हे सातत्याने ती उत्तरं शोधत आहे. आमच्या घरात जे झालं, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच यामागचा विचार आहे. चौकशी ही पारदर्शक व्हायला पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. अभ्यासपूर्वक फॉलोअप रोहित करत आहेत. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते. ब्लॅक बॉक्सबाबत तांत्रिक माहिती मिळेलच याबाबत मला शंका नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.विलिनीकरणाबाबत बोलताना आज माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केलं नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचं ऑबजेक्टिव्ह काय आहे तर लोकांची काम करावीत. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles