Friday, February 20, 2026

महाराष्ट्र हादरला! अभ्यासासाठी मित्राच्या रूमवर गेली, मृतदेह आढळला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

नांदेडमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू

मित्र माधव काळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नातेवाईकांचा हत्या केल्याचा दावा

आत्महत्या की हत्या यावर अजूनही गूढ कायम

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच नांदेड मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृत मुलीचे नाव शीतल मोरे आहे मिळालेल्या माहितीनुसार, मृत शीतल मोरे ही नांदेड तालुक्यातील पांगरी येथील माधव काळे नावाच्या मित्राच्या रूमवर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. शीतल घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र माधव काळे नावाच्या मित्राच्या रूमवर शीतलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीचा मित्र आरोपी माधव काळेवर नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

यातील तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यामुळे शीतल मोरेचे छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात आले आहे.दरम्यान खरचं शीतलने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles