आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेसाठी आज (20 डिसेंबर) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने पत्रकार परिषद घेऊन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये महत्वाचे म्हणजे, शुभमन गिलला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. तर इशान किशनची टी-20 विश्वचषकाच्या संघात एन्ट्री झाली आहे.
7 फेब्रुवारी 2025 पासून टी-20 विश्वचषक 2026 चा थरार रंगणार असून 8 मार्च 2026 पर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत 30 दिवसांत 55 सामने खेळवण्यात येणार असून 20 संघ निश्चित करण्यात आले आहे.इशान किशनने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या स्पर्धेत इशान किशनने 197 च्या स्ट्राईक रेटने 33 षटकारांसह 517 धावा ठोकल्या. तसेच इशान किशनच्या नेतृत्वात झारखंडनं पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे.अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.
2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी ग्रुप
ग्रुप A : भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया, यूएसए
ग्रुप B : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
ग्रुप C : इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
ग्रुप D : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई, कॅनडा


