सभापती प्रा.राम शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सर्पदंश झालेल्या तलाठी श्री आकाश केदार यांची जामखेड येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली..
जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे कार्यरत असलेले तलाठी श्री. आकाश काशी केदार (मूळ रहिवासी पारनेर तालुका) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करत असताना दुर्दैवाने सर्पदंशाला बळी पडले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी शिलदीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती कळताच महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज हॉस्पिटलला भेट देऊन श्री.आकाश केदार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांचा आढावा घेतला आणि तलाठी केदार यांना धीर दिला तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, “जनतेची सेवा करताना अशा प्रकारे एका प्रामाणिक शासकीय कर्मचाऱ्याला जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
सभापतींच्या या भेटीमुळे आकाश केदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी त्यांच्या आरोग्यलाभासाठी प्रार्थना केली आहे.


