संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खाजगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे 50 हजार रुपयांच्या प्रकरणात लाच नसती विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख असे यांचे नाव असून हा पारकर संगमनेर मध्ये समोर आलाय. हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या नाशिक युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रकद्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची वाहतूक सुरळीत सुरू राहावी आणि त्यांच्या ट्रकवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आरोपी रमजान नजीर शेख (वय २८, व्यवसाय पत्रकारिता व शेती, रा.मांडवे, ता.संगमनेर, जि. अहमदनगर) याने तलाठी अक्षय ढोबळे यांच्या सांगण्यावरून १६ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने यानंतर तलाठी अक्षय ढोबळे यांची रमजान शेख याच्या समक्ष भेट व खडी ट्रक वाहतुकीबाबत चर्चा केली. त्यावर तक्रारदाराने दोघांना ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी आपल्या खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नये आणि ती सुरळीत चालू ठेवावी, अशी विनंती केली. यावर तलाठी अक्षय ढोबळे यांनी पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवली, परंतु या बदल्यात गाड्या फक्त दोन महिनेच चालतील, असे सांगितले.


