मोटार वाहन निरीक्षकांचा तालुकानिहाय दौरा निश्चित
अहिल्यानगर, – येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील मोटार वाहन निरीक्षकांचा तालुकानिहाय दौरा निश्चित केला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.
शेवगाव तालुका :
जानेवारी : ७ व २०
फेब्रुवारी : ५ व २०
मार्च: ५ व २०
एप्रिल : ६ व २१
मे : ७ व १९
जून : ८ व २२
श्रीगोंदा तालुका :
जानेवारी: ८ व २१
फेब्रुवारी: ६ व २३
मार्च: ६ व २३
एप्रिल: ७ व २२
मे: ८ व २०
जून: ९ व २३
कर्जत तालुका:
जानेवारी: ९ व २२
फेब्रुवारी: ९ व २४
मार्च: ९ व २४
एप्रिल: ८ व २३
मे: ११ व २१
जून: १० व २४
पाथर्डी तालुका:
जानेवारी: १२ व २७
फेब्रुवारी: १० व २५
मार्च: १० व २५
एप्रिल: ९ व २७
मे: १२ व २५
जून: ११ व २
पारनेर तालुका:
जानेवारी: १३ व २८
फेब्रुवारी: ११ व २६
मार्च: ११ व २७
एप्रिल: १० व २८
मे: १३ व २६
जून: १२ व २९
जामखेड तालुका :
जानेवारी : १४ व २९
फेब्रुवारी : १२ व २७
मार्च : १२ व ३०
एप्रिल : १५ व २९
मे: १४ व २८
जून : १५ व ३०
काष्टी : १५ जानेवारी, १६ फेब्रुवारी, १६ मार्च, १६ एप्रिल, १८ मे व १६ जून.
प्रत्येक तालुक्याचा मासिक दौरा निश्चित करण्यात आला आहे. संबंधित दिवशी शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टी असल्यास, किंवा प्रशासकीय कारणांमुळे दौरा रद्द झाल्यास, त्याची पुढील तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.
शिबिरात अपुरी कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाहीत. सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने तसेच बसची तपासणी केली जाणार नाही.
शिबिर आयोजित केलेल्या तालुक्यातील नागरिकांचीच कामे केली जातील. तपासणीसाठी येणाऱ्या तात्पुरत्या नोंदणी झालेल्या, परिवहनेतर (Non-Transport) वाहनांसाठी हमीपत्र (डिसक्लेमर) आवश्यक आहे. हमीपत्र नसलेल्या वाहनांची तपासणी केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


