नगर जिल्ह्यातील शिक्षिकेचा विनयभंग करीत, पतीसह तिला जबर मारहाण करण्यात आली. साडी ओढून, शिक्षिकेला लज्जा उत्पन्न होईल, असे गैरकृत्य करण्यात आले. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेवून, जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेपिडित 35 वर्षिय विवाहिता तालुक्यातील एका शाळेत शिक्षिका आहेत. (दि. 19 सप्टेंबर) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरी, नव्या बांधकामाच्या वादातून राडा सुरू आहे, असे समजताच शिक्षिका शाळेतून सुट्टी घेऊन घरी आल्या. सरपंच गणेश ठेका बाचकर व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाचकर तेथे उपस्थित होते. चर्चा सुरू असताना, गावातील पाचजणांनी अचानक तेथे धुमाकूळ घातला. शिविगाळ करीत थेट शिक्षिकेसह पतीवर हल्ला केला.
पती- पत्नीला लाथाबुक्क्यांसह काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ‘तुम्हाला जिवंत राहू देणार नाही. तुमची इज्जत गावभर घालवू. पोलिसात फिर्याद दिल्यास, पतीविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू,’ अशी धमकी शिक्षिकेसह पतीला देण्यात आली.
पिडित शिक्षिकेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दामु मनाजी जाधव, अनिल दामु जाधव, किरण दामु जाधव, निखील छोटु जाधव, रोहीत छोटु जाधव (सर्व रा. वावरथ, ता. राहुरी) या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


