Friday, February 20, 2026

अहिल्यानगर शहरात शिक्षकाने पावसात खड्ड्यांपासून वाचवली शेकडो वाहने

शिक्षकाने पावसात खड्ड्यांपासून वाचवली शेकडो वाहने
डॉ.बागुल यांनी ड्रेनेज खड्ड्यांची झाकणेही बसवली

अहिल्यानगर-
मंगळवारी दुपारी शहर भागात जोरदार प्रमाणात पाऊस झाला.शनी चौकातून माळीवाडयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज चेंबरची झाकणे पाण्याच्या दबावामुळे बाजूला पडली.चेंबर उघडे पडून मोठे खड्डे तयार झाले.पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण वाहनासकट खड्ड्यांमध्ये पडू लागले.
चौकात वृत्तपत्र घेण्यासाठी आल्यामुळे व पावसामुळे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना तेथेच आडोशाला थांबावे लागले.परंतु वाढत्या पावसात येणारी जाणारी वाहने,माणसे पाहून जणू काय ट्राफिक पोलीसासारखे खड्डे व रस्ता नियंत्रणाचे सुमारे तीन तास भर पावसात त्यांनी काम केले.पाऊस थांबल्याशिवाय गत्यंतर नव्हते.मग शेकडो माणसे व वाहने खड्ड्यांमध्ये पडण्यापासून वाचवण्याचे काम त्यांनी हाती घेतले.प्रसंगी पाण्यामुळे त्यांच्या बंद पडलेल्या गाड्या देखील त्यांनी ढकलल्या.दोन्ही बाजूंच्या काही वाहने व माणसांना परस्पर माघारी देखील पाठवले.
जवळच भंगारात पडलेले मोकळे बाकडे खड्ड्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला.परंतु पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तेही वाहून जाऊ लागले.रस्ता अडवल्यामुळे काही वाहन चालकांची बोलणी देखील खावी लागली तरी बागुल यांनी हे काम नेटाने चालू ठेवले.पाऊस संपून पाणी ओसरल्यानंतर त्यांनी घरचा रस्ता धरला.
दोन राष्ट्रपती पदके व हजारो पारितोषिकांनी डॉ. बागुल सन्मानित असून आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रणाची त्यांनी प्रशिक्षणे घेतलेली आहेत.वेळेचे भान राखत शिक्षकाने भर पावसात केलेली ही सकारात्मक कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles