अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौड मार्गावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी रांगोळी काढल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या रांगोळीच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून कोठला स्टँड चौकात रास्तारोको आंदोलन केले, ज्यामुळे पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान,कोठला स्टँड चौकात रास्तारोको आंदोलन, पुणे -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. दुर्गामाता दौड मार्गावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी रांगोळी काढल्यावरून वातावरण तापले. याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज रस्त्यावर.
दरम्यान, रांगोळी काढल्या प्रकरणी आरती संग्राम रासकर आणि संग्राम रासकर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोठला येथे आंदोलनात करणाऱ्यावर पोलिसांचा लाठीमार. बाळाचा वापर करून पोलिसांनी जमाव पांगवत रस्ता मोकळा केला.
दरम्यान, हा तणाव आता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, जमावाला पांगवण्यासाठी हा लाठी चार्ज करण्यात आला. याप्रकरणी 30 ते 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


