Thursday, September 11, 2025

नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

नगर-दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तरुण विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार साई शरद कोहक (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, MH14 GD 9851 क्रमांकाची चारचाकी कार अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना, नंबर प्लेट नसलेली बजाज पल्सर दुचाकी दौंडच्या दिशेने येत होती. बेलवंडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात घडला. साई कोहक हे इंदिरा गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्ष सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. अपघाताच्या वेळी ते दुचाकीवरून कॉलेजला जात असल्याचे समजते.

प्राथमिक तपासात, चारचाकी वाहनात सरकारी वैद्यकीय अधिकारी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. अपघातस्थळी सापडलेल्या ओळखपत्रावर वाहनचालकाचे नाव संजय पांडुरंग शिंदे, ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा, असा उल्लेख होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांचा वेग मोठा होता, विशेषतः दुचाकीचा वेग जास्त असल्याची चर्चा होती.

घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण केली. इंदिरा गांधी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापकही विद्यार्थ्याच्या निधनाची बातमी समजताच घटनास्थळी पोहोचले.

साई शरद कोहक यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, ते आईचा प्रमुख आधार होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने घारगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात कोवळ्या जीवाचा झालेला हा अंत संपूर्ण गावासाठी मोठा धक्का ठरला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles