Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या घराबाहेर हातात रिव्हॉल्वर घेवून दहशत

अहिल्यानगर – महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर आ. संग्राम जगताप यांच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये रिव्हॉल्वर असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत अहिल्यानगरमधील भयाण परिस्थिती उघडकीस आणल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारांचा जोरात प्रचार सुरू आहे. निवडून येण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहे. समोर तुल्यबळ उमेदवार असला तर साम-दाम-दंड-भेद याचा वापर सुरू असतो. प्रशासन निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी दादागिरी व गुंडगिरीचा वापर केला जात आहे.

मनपाच्या प्रभाग १ मध्ये काँटे की टक्कर होत आहे. याठिकाणी तिरंगी लढती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रामदास वाणी यांना प्रचार करण्यासाठी घराबाहेर पडू दिले जात नाही. त्यांना घरातच कोंडण्यात आले असून, बाहेर खडा पहारा सुरू आहे. आ. जगताप यांचे स्वीय सहायक व बॉडीगार्ड हे घराबाहेर असून, वाणी यांना बाहेर पडू दिले जात नाही. बॉडीगार्डच्या हातात रिव्हॉल्वर आहे.
https:/https://x.com/andharesushama/status/2008223700542448126?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2008223700542448126%7Ctwgr%5E10778181b598b8f354357c4aefbd606bbd2208cb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamana.com%2Fa-video-posted-by-sushma-andhare-shows-mla-sangram-jagtaps-bodyguard-and-personal-assistant-allegedly-pressuring-an-opposition-candidate-standing-outside-his-house-with-a-revolver%2F

सुरक्षारक्षक हा पोलीस कर्मचारी आहे ते कुठे जातात त्यांचे लोकेशन माहिती असते. त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करण्याचा हा खिल्लरपणा आहे. स्थानिक लोक त्यांना व्हिडिओ देतात आणि ते राज्याच्या राज्याच्या माध्यमातून जातात. ज्यांना वार्ड मध्ये उमेदवार देता येत नाहीत असे लोक कला करून गल्ला मारण्याचा प्रयत्न करतात मात्र असे करण्याचे दिवस आता संपले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांवर असे आरोप होत असतील तर त्याचा शोध घेऊन व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे.
आमदार – संग्राम जगताप

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles