Friday, February 20, 2026

ठाकरे सेना-मनसेची युती ;अहिल्यानगरमध्ये कार्यर्त्यांचा जल्लोष

अहिल्यानगर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे सेना व मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे. या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना पदाधिकारी व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी दिल्लीगेटला फटाके वाजवून जल्लोष केला. यावेळी ठाकरे बंधूंचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.

बुधवार दि. २४ रोजी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेना-मनसेची युती झाल्याने अहिल्यानगर शहरातील ठाकरे सेना व मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्लीगेट येथे एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख राजेेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन डफळ, मनसेचे शहर प्रमुख गजेंद्र राशिनकर, सुमित वर्मा, अ‍ॅड. अनिता दिघे, विनोद काकडे आदींसह शिवसैनिक, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर प्रमुख, जिल्हाप्रमुखांनी एकमेकांना भरवला लाडू :
यावेळी दोन्ही पक्षांच्या महानगर प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हाप्रमुख यांनी एकमेकांना तसेच शिवसैनिक, मन सैनिकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार :
जल्लोषानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोलताना म्हटले की, शिवसेना, मनसे आता दिलसे एकत्र आली आहे. ठाकरे ब्रँड ही महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज निश्चित आनंदी झाले असतील. तमाम महाराष्ट्रवासीय आनंदी झाले आहेत. आगामी मनपा निवडणुकीत शिवसेन, मनसे महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसह विजयाचा झेंडा फडकवणार, असे प्रतिपादन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles