मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन शुभारंभ.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाला महत्व द्यावे- यशवंत डांगे.
नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मोतीलालजी फिरोदिया खुल्या बुद्धिबळी स्पर्धेचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधीक्षक प्रा. गायकवाड सर यांनी पटावर चाल देऊन शुभारंभ करण्यात आले यावेळी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, पंच प्रवीण ठाकरे, पवन राणे, शार्दुल टापसे, देवेंद्र ढोकळे, प्रशांत गागरे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर आदीसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी प्रस्ताविकात संघटने विषयी व स्पर्धेविषयी माहिती सांगितली. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, बुद्धिबळ खेळामुळे आपल्याला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते व बुद्धिबळ खेळामुळे बुद्धीला चालना भेटते व जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाला महत्त्व द्यावे तसेच बुद्धिबळ खेळातून आपले करिअर घडवण्यासाठी निश्चित मदत होते व अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ संघटनेचे कार्य उत्तम असून बुद्धिबळ खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. या स्पर्धा आयोजनामुळे अनेक आय एम, एफ एम, ग्रँडमास्टर घडले जातील असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मांनले.
बुद्धिबळ स्पर्धेच्या सत्राचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन शुभारंभ
- Advertisement -


