अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रतापराव पाटील चिखलीकर आल्यापासून तीन हजाराहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मुखेड येथील चव्हाणवाडी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. सरकार बँकांशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणेर 1500 रुपये बँकांकडे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.
लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जत आहे. सरकार बँकांनी चर्चा करणार आहे. महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून ३० ते ४० हजार रुपये देण्याचा विचार केला जात आहे. या महिलांना दिले जाणारे १५०० रुपये बँकांकडे जमा होतील, असा हा प्लान आहे.जित पवार यांनी सांगितलं की, लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधीकधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही. या योजनेतून महिलांना मदत होते. आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे. यासंदर्भात बँकांशी बोलणं सुरु आहे.
काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत. १५०० रुपये महिलांना दिले जातात. त्याऐवजी ३० ते ४० हजार रुपये महिलांना द्यायचे. हप्ता लाडकी बहीण योजनेतून जाईल. जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. महाराष्ट्रातील काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितलं.


