Thursday, October 30, 2025

नगर शहरातील रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महानगरपालिकेने हटवली

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महानगरपालिकेने हटवली

दोन डीपी रस्त्यांना जोडणाऱ्या लिंक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

महापालिकेचे रस्ते, मोकळ्या जागेतील अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – शहरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला आहे. हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात इतरत्र रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात ११५ पेक्षा अधिक घरे व १२ पेक्षा अधिक व्यावसायिक टपऱ्या अडथळा ठरत होत्या. या अतिक्रमणांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. सुमारे ४०० मीटर लांब व १२ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटारी, भुयारी गटार योजना व काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

अतिक्रमणामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले होते. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यात लक्ष घालून अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ११५ पेक्षा अधिक घरे व १२ पेक्षा अधिक टपऱ्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. रस्त्याच्या मंजूर असलेल्या कामात नागरिकांची अतिक्रमणे असल्यास ती काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles