शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे खासगी व जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार भरती

नागपूर: राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच ‘पवित्र पोर्टल’ द्वारे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ही माहिती दिली.

रोस्टर प्रमाणीकरण बंधनकारक: खासगी शिक्षण संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ‘रोस्टर’ (बिंदूनामावली) प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही माहिती पोर्टलवर मागवली जाईल. पवित्र पोर्टलद्वारेच नियुक्त्यांना मान्यता: केवळ पवित्र पोर्टलद्वारे भरलेल्या पदांनाच शासन मान्यता देणार असून, अशाच पदांना भविष्यात वेतन लागू केले जाईल. पारदर्शकता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी शाळांमधील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाची अनुकंपा तत्त्वावरील पदे तातडीने भरली जातील. आतापर्यंत प्राप्त १०४८ प्रस्तावांपैकी ७९१ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, उर्वरित प्रलंबित प्रस्तावांवरील त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन’ समायोजन खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे केले जाणार आहे.समूह शाळा आणि विस्तारीकरण:जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांचे ‘समूह शाळेत’ रूपांतर करण्याचा विचार शासन करत आहे. तसेच ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे, तिथे १० वी पर्यंतचे वर्ग जोडण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील.शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रोस्टर प्रमाणीकरण आणि पोर्टलद्वारे नियुक्तीमुळे खऱ्या अर्थाने पात्र उमेदवारांना न्याय मिळेल असे, रणजितसिंह देओल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांनी सांगितले.

मंत्रालयात १८ मार्च रोजी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत अनेक मोठे निर्णय जाहीर करण्यात आले. या बैठकीला शालेय शिक्षण उपसचिव आबासाहेब कवळे, शिक्षण संचालक महेश पालकर (पुणे), उपसंचालक राजेश कंकाळ (मुंबई), कक्ष अधिकारी संगीता श्राफ उपस्थित होत्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे, कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर, मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, संदीप कदम, राजेश सदावर्ते, सुरेश सोंगेकर, सुभाष मस्के, शेषराव वाकडे, मधुकर घनसावंत, अशोक गायकवाड, शिवाजी बिबराळे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles