केडगाव स्मशानभूमीतील ओट्यावरील जाळ्या दुरुस्त करून द्या
मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याकडे मा.सभापती मनोज कोतकर यांची निवेदनाद्वारे मागणी
अहिल्यानगर : केडगाव येथील स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आलेल्या ४ ओट्यावरील जाळ्यांची दूरावस्था झाली असून त्या अक्षरशा तुटलेल्या आहे अंत्यविधी करताना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच अंत्यविधी करताना प्रेत ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रेताची विटंबना होऊ शकते, नागरिकांच्या भावना देखील दुखावल्या जातील तसेच येथे पाण्याची टाकी असून ती नादुरुस्त झाली आहे त्यामुळे पाण्याची समस्या देखील तीव्र झाली आहे बाथरूम मधील नळ ना दुरुस्त झाले असल्यामुळे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे तरी महापालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने केडगाव येथील अमरधाम मधील ओट्यावरील जाळ्या दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी उपयुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे


