Saturday, February 21, 2026

राष्ट्रवादीची ताकद वाढणार, लवकरच सगळ्यांचं मनोमिलन; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

‘भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही.’, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. सध्या त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. शरद पवारांच्या या विधानावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवारांनी एक आशेचा किरण दाखवलाय. लवकरच सगळ्यांचे मनोमिलन व्हावे ही इच्छा’, असं विधान भुजबळांनी केले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘मी मागेही सांगितले होते ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी मी बोललो होतो ही सगळीच कुटुंब एकमेकांपासून दुरावलेली आहेत. ती सगळी कुटुंब जर एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल.’ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल असं देखील भुजबळांनी सांगितले.

तसंच, ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आज शरद पवार यांनी जे विधान केले आहे त्यामाध्यमातून त्यांनी एक आशेचा किरण दाखवला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या देखील अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना मिळेल. राष्ट्रवादीची शक्ती देखील यामुळे निश्चितच वाढणार आहे. लवकरच सगळ्यांचं मनोमिलन होईल अशी इच्छा आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार निर्णय घेऊ शकतात. कुणाला वाटलं मी पुढाकार घ्यावा तर मी निश्चित पुढाकार घेईन. पण पवारांच्या घरात वाढलेले अजित पवार आहेत त्या सर्वांना मध्यस्थांची काही गरज आहे असं मला वाटत नाही.’, असं देखील भुजबळ म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी नुकताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले आहे. ‘भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. भविष्यात एकत्र यायचे की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तर आम्ही विचाराने एकत्र आहोत.’, असं विधान शरद पवार यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles