अहिल्यानगर -लिंकरोड, केडगाव परिसरात शिरूर पोलीस स्टेशन, पुणे येथे कार्यरत असलेले संतोष बुधवंत (वय 38) यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करत 62 हजार 500 रुपये किमंतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली.बुधवंत हे पुणे येथे पोलीस सेवेत असून ते 16 ऑगस्ट रोजी ड्युटीवर गेले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी अर्चना, आई मंदाबाई आणि मुले शिवांश व सुप्रिया रक्षाबंधनासाठी पाथर्डी येथील मूळ गावी गेले होते. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घरी परतल्यावर त्यांना घराचे लॉक तुटलेले आणि सामान आस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी तातडीने संतोष यांना फोनद्वारे कळवले आणि डायल 112 वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता, बेडरूममधील कपाटाचे लॉकर तुटलेले आढळले.
चोरट्यांनी 20 ग्रॅमचे मंगळसूत्र, 5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची चैन, 2 ग्रॅमचे कानातले, चांदीच्या पाच अंगठ्या, दोन ब्रासलेट, चार जाडव्या, पायातील पैंजण आणि 16 हजार रुपये रोख लंपास केले. बुधवंत यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.


