Friday, February 20, 2026

​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन समाजकंटक हद्दपार

​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सूत्रे हाती घेताच मोठी कारवा​काका ऊर्फ अब्दुलहक फकीर मोहंमद कुरेशी, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर फैजान इद्रिस कुरेशी, ( रा. झेंडीगेट, जि. ता. अहिल्यानगर), ​म्हम्या ऊर्फ संदिप शरद शिंदे, ( रा. तय्यब मशीद मागे, जि. ता. अहिल्यानगर ) भगवान चाळ ( रा. भोसले आखाडा, जि. ता. अहिल्यानगर ) यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. ​पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यामार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन मा. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी वरील तिन्ही व्यक्तींना सहा महिन्यांकरिता जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. सदरच्या कारवाईसाठी ​पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, आणि त्यांच्या पथकातील महिला पोलीस हवालदार शिल्पा कांबळे, पोलीस हवालदार विशाल दळवी, विनोद बोरगे, बाळासाहेव दौंड, वसीम पठाण, साबीर शेख, पोलीस नाईक विजय ठोंबरे, तसेच पोलीस अंमलदार सुरज कदम, सत्यम शिंदे, राम हंडाळ, दिपक रोहकले, सचिन लोळगे, रिंकु काजळे, व महिला पोलीस अंमलदार शिला ढेरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles