Wednesday, March 11, 2026

धर्मवीर गडावर परंपरेने बलिदान स्फूर्ती दिनाचे आयोजन

धर्मवीर गडावर परंपरेने बलिदान स्फूर्ती दिनाचे आयोजन करण्यात आले…

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्ताने धर्मवीरगड (बहादूरगड) पेडगाव येथे सेवा समितीच्या वतीने मागील ९ वर्षापासून बलिदान स्फूर्तीदिन कार्यक्रमाची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात शिवशंभू भक्तांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर ज्या मातीमध्ये शंभुराजे यांचे रक्त सांडले तिथे रक्तदान शिबिर घेऊन राजेंना आदरांजली अर्पण करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीमध्ये काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातून शिवशंभू भक्तांनी बलिदान स्फूर्ती दिनाला हजेरी लावली होती.

प्रवक्ते देवयानी घरत, सुनील गायकवाड सर यांनी शिवराय आणि शंभुराजे यांच्या विचारांचा जागर केला. समितीचे अध्यक्ष शंकराप्पा जाधव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तुलनेत यावर्षीचा कार्यक्रम छोटा जरी असला तरी या कार्यक्रमात उपस्थित असणारे शिव विचारांचे शिलेदार मात्र गर्दी पेक्षा दर्दी जास्त आहेत, आणि यावर्षी झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून पुढील वर्षी कार्यक्रम चांगल्या ताकतीने करू असे आश्वासनही त्यांनी दिले..

कार्यक्रमासाठी उपस्थित शंकर आप्पा जाधव, राहुल आबा हारगुडे, प्रवीण झांबरे, मयूर गावडे, सागर जगताप, प्रवीण तकिक, लक्ष्मण कोलते, प्रवीण जाधव, देवेंद्र देव, राकेश भामरे, महेश लावंड, दादासाहेब मोहिते, गणेश भानवसे, मनोज वाबळे, आरतीताई भोगाडे, मायाताई खेंडके, शितलताई लांडे, कविताताई वाघ, आणि सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles