अहिल्यानगर -जिल्हा पोलीस दलातील 69 पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या असून विनंती अर्ज केलेल्या 93 अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली आहे. 162 पोलिसांच्या विनंती बदल्या बाबतचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी (13 ऑक्टोबर) काढला.अधीक्षक घार्गे यांनी मे महिन्यात पदभार घेतल्यानंतर जून महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. यामधील काही अंमलदारांचा बदल्याबाबत आक्षेप होता. त्यांनी आपली बदली इतर ठिकाणी करावी यासाठी विनंती अर्ज केला होता. तसेच काही अंमलदारांना पोलीस ठाणे/शाखेत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विनंती बदली करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. असे एकुण 162 अंमलदारांचे विनंती बदलीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. अधीक्षक घार्गे यांनी विनंती अर्ज करणार्या अंमलदारांची अडचण प्रत्यक्ष जाणून घेतली.त्यापैकी 69 अंमलदारांचे अर्ज मान्य करत त्यांची विनंती बदली केली आहे. तर 93 अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, दरवर्षी प्रशासकीय बदल्या करण्यात येत होत्या मात्र विनंती बदल्या करण्यात येत नव्हत्या. यंदा अधीक्षक घार्गे यांनी विनंती बदल्या केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 69 पोलिसांच्या बदल्या; जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश
- Advertisement -


