Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर शहरात तृतीयपंथीयाला मारहाण ; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर -येथील केडगाव परिसरात एका तृतीयपंथीयाला जुन्या प्रेमसंबंधातून आणि पैशांच्या वादातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. लोंढेमळा भागात गुरुवारी (25 डिसेंबर) रात्री ही घटना घडली असून, संशयित आरोपींनी सोन्याचे दागिने आणि मोबाईल हिसकावून घेतल्याची फिर्याद पीडित व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादी हे केडगाव देवी मंदिराजवळ राहतात. त्यांचे संशयित आरोपी ऋषीकेश गवळी याच्याशी मागील दहा वर्षांपासून संबंध होते. मात्र, आरोपीने लग्नाची माहिती लपवून फसवणूक केल्याने पीडिताने त्याच्याशी संबंध तोडले होते. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, तसेच व्यवसायासाठी घेतलेले पैसे आणि सोन्याचे दागिने परत देण्यास टाळाटाळ करत होता. गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी आपल्या शिष्यांसह लोंढेमळा येथे पैसे मागण्यासाठी गेले होते.त्यावेळी आरोपी ऋषीकेश त्याचे आई-वडील आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ केली. लाकडी दांडक्याने मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सहकार्‍यांनाही आरोपींनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles