Thursday, February 19, 2026

श्रीगोंदा तालुक्यात पिकअपच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा -भावाला कामावर जाण्यासाठी सोडायला जात असताना भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुयातील काष्टी येथे घडली.

या अपघातात काष्टी गावातील गजाननवाडी येथील सचिन शिवाजी माने (वय ४२) आणि त्यांचे मोठे बंधू संतोष शिवाजी माने (वय ४५) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन माने हे पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील एका कंपनीत कार्यरत होते. कंपनीची बस काष्टी गावातील दत्त मंदिर परिसरात येत असल्याने सचिन यांना कामावर जाण्यासाठी बसच्या ठिकाणी सोडण्यासाठी त्यांचे मोठे बंधू संतोष माने हे दुचाकीवरून त्यांना सोबत घेऊन जात होते. आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काष्टी गावात नगर-दौंड रस्त्यावर श्रीगोंदा चौकात माने बंधूंच्या दुचाकीला नगरकडे जाणार्‍या भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या माने बंधूंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली असून अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

नगर शहरात गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळील बेग पटांगण परिसरात घरगुती गॅस टाक्यांमधून अनधिकृतपणे गॅस भरून लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश शिवाजी धोत्रे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अरविंद वसंत वाघमारे (रा. संजय नगर, काटवन खंडोबा, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी आरोपी मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला ओमनी गाडीमध्ये (क्रमांक MH १६ R ४२८७) घरगुती गॅस टाक्यांतून बेकायदेशीररीत्या रिफिलिंग करत असताना पथकाने छापा टाकला.

​या छाप्यात पोलिसांनी १ लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची ओमनी गाडी, इलेक्ट्रीक मोटार, कॉम्प्रेसर, वजन काटा आणि भारत व एचपी कंपनीच्या तीन गॅस टाक्या असा मुद्देमाल जप्त केला. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही परवान्याशिवाय गॅसची चोरी करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles