कामात हालगर्जीपण
दोन ग्रामसेवक थेट निलंबित
विस्तार अधिकार्यासह एका ग्रामसेवकाला दोन वेतन वाढी रोखण्याची नोटीस
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी बुधवारी शेवगाव तालुक्यात भेट दरम्यान कामात हालगर्जीपणा करणार्या दोन ग्रामसेवकांवर गुरुवारी थेट निलंबिनाची कारवाई केली आहे. तसेच एका ग्रामसेवकासह एका विस्तार अधिकार्यांला कायम स्वरूपी दोन वेतन वाढ का रोखण्यात येवू नयेत, अशी नोटीस दिल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी बुधवारी शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेट देत विकास कामे आणि प्रशासकीय कामे तपासली. यात शहरटाकळी गावात ग्रामसेवक सुभाष गर्जे आणि देवटाकळी गावात ग्रामसेवक अशोक नरसाळे यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये फेर कर आकारणी आणि मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीत काहीच काम केले नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर गुरूवारी नगरहून थेट निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या ग्रामसेवकांच्या कामाचे नियंत्रण करणारे विस्तार अधिकारी सुजित भोंग यांना त्यांच्या दोन वेतन वाढी कायम स्वरूप का रोखण्यात येवू नयेत, तर दहिगाव-नेेचे ग्रामसेवक प्रशांत बरबडे यांना देखील दोन वेतन वाढ रोखण्याची नोटीस बजावली आहे.


