Saturday, March 7, 2026

पाथर्डी तालुक्यात दोन गट आमने-सामने; सरपंचांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

चिचोंडी शिराळ: शालेय कार्यक्रमानंतर पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे दोन गटांमध्ये जोरदार वादंग झाले. मारहाण व विनयभंगाच्या परस्पर तक्रारी पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिचोंडीचे विद्यमान सरपंच श्रीकांत एकनाथ आटकर यांच्यासह 11 जणांविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने चर्चेने रंग धरला आहे.भगवान अण्णा फुलमाळी (रा.चिचोंडी शिराळ,पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीतील मजकूर असा 1 मार्च रोजी तिरमल वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक संच व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आटोपून घरी आलो. एकनाथ गोविंद आटकर, श्रीकांत एकनाथ आटकर, राहुल व्यंकू आटकर, योगेश व्यंकू आटकर, अनिल साहेबराव आटकर, बाबासाहेब साहेबराव आटकर, गुलाब चंद्रभान फुलमाळी, काशीनाथ साहेबराव फुलमाळी, संदीप चंद्रभान फुलमाळी, साहेबराव गोविंद आटकर व भाऊसाहेब साहेबराव फुलमाळी हे लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व लाकडी दांडके घेऊन घरी आले. ‌‘तू कोणाला विचारून कार्यक्रम घेतला?‌’ असा जाब विचारत त्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात भगवान फुलमाळी यांच्या हाताला दुखापत झाली.

भास्कर आटकर यांच्या घरात जाऊन त्यांनाही हॉकी स्टिक व दांडक्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तक्रार देण्यासाठी जात असताना मांडवे गावाजवळ बोलेरो व एक विनानंबर स्विफ्ट कार आडवी लावून पुन्हा हल्ला केला. हल्ल्यातील जखमी भगवान फुलमाळी व भास्कर आटकर या दोघांवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान दुसऱ्या गटानेही पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे. दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार, 1 मार्च रोजी शाळेतील कार्यक्रमा दरम्यान भगवान फुलमाळी यांनी कुटुंबातील महिलेसोबत गैरवर्तन केले. संदीप फुलमाळी यांनी जाब विचारल्याने भगवान फुलमाळी, करण फुलमाळी, भास्कर हाटकर व दीपक फुलमाळी यांनी संदीप फुलमाळी यांना मारहाण केली. या झटापटीत गळ्यातील मणीमंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles