राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’; महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’; महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ

मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील महिलांमधील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे जिल्हा विक्री केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार आहे.

प्रत्येक जिल्हा विक्री केंद्रासाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे केंद्र जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील. या केंद्रात प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सभागृहाची सुविधाही असेल. याविक्री केंद्रासाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया, आराखडे तयार करणे, कामाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच या केंद्रांची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles