यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यूनियन बँकेत एकूण ५०० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट), असिस्टंट मॅनेजर (आयटी) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी यूनियन बँकेद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
यूनियन बँकेतील या नोकरीसाठी २२ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट )पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच फायनान्समधील MBA/ PGDM पदवी प्राप्त केलेली असावी.
असिस्टंट मॅनेजर (आयटी) पदासाठी B.E/B.Tech/MCA/M.sc (IT) पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत काही सर्टिफिकेशन कोर्स केलेला असावा. संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती केली जाणार आहे.
यूनियन बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, ग्रुप डिस्कशनद्वारे केली जाणार आहे. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. यामध्ये तुम्हाला यश मिळाले तरच तुमची निवड होणार आहे. तुम्ही www.unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८,४८० रुपये पगार मिळणार आहे.


