केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा ऑक्टोबर मध्ये प्रवरानगरला येणार, विखे पाटलांचे निमंत्रण स्वीकारले.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना पुढील महिन्यात प्रवरानगरला येण्याचे निमंत्रण दिले. यापूर्वीही शहा प्रवरानगर आणि शिर्डीला आलेले आहेत.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण नंतर १५ ऑक्टोबर २०२५ पासून यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटीव व माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यासह अन्य कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार आहेत.
विखे पाटील शहा यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच शहा यांनी यापूर्वीही त्यांचे निमंत्रण स्वीकारून लोणीला आले होते. आता विखे पाटील यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलन संबंधी महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीला कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. त्या समितचे अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे आहे.
ही जबाबदारी पार पाडल्यानंतर विखे यांनी मंत्री शहा यांची भेट घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ऑक्टोबर मध्ये प्रवरानगरला येणार; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निमंत्रण स्वीकारले
- Advertisement -