संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. विशेष मकोका न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलंय. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता.

या अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत. वाल्मीक कराडला का दोष मुक्त करण्यात येत नाही. याबाबत महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामध्ये वाल्मीक कराड हा टोळीचा मोरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली.

वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. अवदा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, फोनवर धमकवणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे, त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब त्याचबरोबर डिजिटल इव्हिडन्स फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्यात येत नाही. वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराडच या घटनेचा सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे

1) वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य कोर्टाच निरीक्षण.

2) वाल्मीक कराडने आवाजा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला.

3) वाल्मीक कराड वर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख.

4) वाल्मीक कराड वर एकूण 20 गुणी 7 गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातली.

5) वाल्मीक कराड वर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख वाल्मीक कराड संदर्भात डिजिटल व्हिडिओ कोर्टात संपूर्ण पुरावांचा उल्लेख.

6) साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्याय वैद्यकीय पुरावांच्या आधारे वाल्मीक कराडच टोळीचा मोरक्या.

7) खंडणी प्रकरणात त संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचना अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हस्ते चा गुन्हा केला.

8) दोन कोटी साठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या.

10) कराडच्या निर्दोष मुक्तीची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असे न्यायालयाने म्हटले आहे.

11) साक्षीदारांची जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे वाल्मीक कराड प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचे दर्शवत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles