आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय काय प्रयोग करत आहेत याची कल्पनाही करता येणार नाही. कोणी डान्स करतं, कोणी अभिनय करतं तर कोणी भन्नाट आयडिया वापरून लोकांचं लक्ष वेधून घेतं. पण, कधी एखादा साधा भाजीवाला आपल्या आवाजामुळे देशभरात चर्चेचा विषय बनेल असं कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक भाजीवाला थेट रामायणातल्या रावणसारख्या आवाजात भाजी विकताना दिसतोय. त्याची ही हटके स्टाईल पाहून लोक थक्क झाले आहेत.
रस्त्यावर नेहमीप्रमाणे भाजी विकणारा हा माणूस, पण त्याची हाक ऐकली की सगळ्यांचं लक्ष तिकडेच जातं; कारण तो साध्या आवाजात नाही तर थेट रावणासारख्या घनगंभीर आणि दमदार आवाजात ग्राहकांना बोलावत आहे. व्हिडीओमध्ये हा भाजीवाला रस्त्यावर उभा राहून जोरात ओरडताना दिसतो.
“ऐ नारी… बाहर निकल सब्जी खतम हो जायेगी!” त्याचा आवाज, डायलॉग मारायची पद्धत आणि आत्मविश्वास पाहून आजूबाजूचे लोक थांबून पाहू लागतात. साध्या भाजी विक्रीला त्याने नाटकाचा टच दिल्यामुळे हा व्हिडीओ इतरांपेक्षा वेगळा आहे. काहींना हा प्रकार मजेशीर वाटतो, तर काही जण थोडेसे घाबरल्यासारखेही दिसतात. पण, एक गोष्ट सगळेच मान्य करत आहेत, ही स्टाईल पूर्णपणे युनिक आहे.
https://x.com/MyWishIsUs/status/2003752899646787987?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2003752899646787987%7Ctwgr%5E984fab44ba50c0ec1e6a4af6d1fc0d845273aeb6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fvegetable-seller-selling-vegetables-in-ravana-voice-video-goes-viral-on-social-media-sap-05-5599361%2F
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया ट्विटरवर @MyWishIsUs या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
तर कुणी थेट म्हणालं, “मार्केटिंगचा लेव्हल म्हणजे हा” काही जणांनी तर याला फनी ट्विस्ट दिला आहे. अजून एकाने म्हटले, “नारी रील बनवण्यात बिझी आहे, नंतर येते!” तर दुसरा म्हणतो, “हा आवाज ऐकून अभ्यास करायला प्रेरणा मिळेल.” एका युजरने तर थेट रामायणाची आठवण करून देत लिहिलं, “रावणाच्या खानदानातलाच वाटतोय!” या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर हशा, आश्चर्य आणि कौतुक यांचा भन्नाट मेळ पाहायला मिळतोय.


